ठाणे, दि. 10 :- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2021-22 अंतर्गत पायाभूत सुविधांसाठीचे अनुदान मिळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मदसांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी केले.
अल्पसंख्यांक विकास विभागाकडून राज्यातील मदरसांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ़ महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था, नगर पालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शांळांना पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. सन 2021-22 या वर्षाच्या अनुदानासाठी ठाणे जिल्ह्यातील इच्छुक मदरसांनी विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयात सादर करावेत.
