ठाणे, दि. १० : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार आज सायंकाळी सातपर्यंत ठाणे जिल्ह्यातील २२ हजार ९०३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी २४ लाख ३५ हजार १२८ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६८ लाख ४ हजार २५ नागरिकांना तर ५५ लाख १५ हजार ४३० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार ६७३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात ३६० लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले.
