

ठाणे, दि. ११ : रविवार, दिनांक १३/०२/२०२२ रोजी सकाळी १०.००वाजता टिप टॉप प्लाझा, तीन हात नाका, ठाणे येथे ओबीसी राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री सन्मा. ना. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच या कार्यक्रमास वक्ते श्री. हरी नरके ( जेष्ठ विचारवंत ), श्री. ईश्वर बाळबुधे (प्रदेशाध्यक्ष ओबीसी सेल), श्री. बापू भुजबळ (कार्याध्यक्ष अ. भा. म. फुले समता परिषद) यांची उपस्थिती राहणार आहे. तरीही ओबीसी प्रवर्गातील सर्व जाती घटकांच्या प्रतिनिधीनी तसेच, ओबीसी सेल च्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षानी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
राज राजपुरकर
प्रदेश सरचिटणीस
कोकण प्रभारी ओबीसी सेल 8452056777 / 9029939492
