ठाणे दि. 16 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे खेलो इंडिया बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरुप मानधन तत्वावर प्रशिक्षक नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्हता प्राप्त इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी केले आहे.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये मुले व मुलींसाठी बॅडमिंटन खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बॅडमिंटन प्रशिक्षक पदासाठी उमेदवारांचे वय 45 वर्ष वयोगटाच्या आत असावे. अत्युच्च कामगिरी / गुणवत्ता असल्यास समितीच्या मान्यतेने 50 वर्षापर्यंत उमेदवारांना संधी देण्यात येईल. ऑलिंपिक एशियन गेम्स/ जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग/ पदक प्राप्त प्रशिक्षण अनुभव असावा. जागतिक करंडक स्पर्धा / एशियन चॅम्पियनशीप / साऊथ एशियन स्पर्धा / संबंधित खेळाच्या आंतरराष्ट्रीय अधिकृत स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त प्रशिक्षणाचा अनुभव राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी प्रशिक्षणाचा अनुभव असावा. एनआयएस पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत लेवल कोर्सेस किंवा बीपीएड, एमपीएडसह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त -प्रशिक्षणाचा अनुभव. राज्यस्तर खेळाडू बीपीएड- एमपीएड सह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा नॅशनल गेम्स पदक प्राप्त-कमीतकमी 5 वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असावा.
अर्हता प्राप्त उमेदवारांनी आपले अर्ज दि.21 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्टनाका, ठाणे 400601 येथे समक्ष सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक जुबेर शेख (9511827279) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती साळुंखे यांनी केले आहे.
