‘आमचं शिवाजी राजं’ या पोवाड्याचं अनावरण
शिवजयंतीचं औचित्य साधून आज तेजस सौजस या दोन भावांनी साकारलेल्या ‘आमचं शिवाजी राजं’ शिवगीताचं अनावरण महापौर दालनात ठाणे महापौर नरेश म्हस्के व दैनिक जनादेशचे कैलाश म्हापदी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राजेश मोरे, गुरुनाथ पाटील आदी उपस्थित होते. ‘आमचं शिवाजी राजं’ गायक सौजस मोरे, गायक श्री विलास अटक यांनी बहारदारपणे सादर केलं आहे. ते अवघ्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या नसानसात भिनेल, असा शुभाशिर्वाद महापौर म्हस्के यांनी दिला तर कैलाश म्हापदींनी मोरे भावांच्या या गीताला डिजीटल माध्यमांवर भरघोस प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
