नवी मुंबई दि.14 :-कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या शासकीय जडसंग्रह नोंदवहीत नमूद असलेले नादुरुस्त प्रिंटर, झेरॉक्स मशीन व इतर निर्लेखित साहित्य विहित पध्दतीचा अवलंब करून विक्री करावयाचे आहे.
विक्रीसाठीचे निर्लेखित साहित्य सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 यावेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी पहावयास उपलब्ध करून दिले जातील. ज्या व्यक्तींना या वस्तू खरेदी करावयाच्या आहेत त्या इच्छुक व्यक्तींनी आपल्या मोहोरबंद लखोट्यातील निविदा त्यावर “निर्लेखित वस्तू निविदा” असा स्पष्ट उल्लेख करून दि.25 मार्च, 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत विभागीय माहिती कार्यालय, तिसरा मजला, रुम नं.317, कोकण भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिन.400614 या पत्त्यावर विहित कालावधीत पाठवाव्यात. असे आवाहन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी केले आहे.
