मुंबई, दि. 23 : औरंगाबाद महानगरपालिकेच्या 71 शाळा कार्यरत असून त्यापैकी महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये 51 शाळा सुरू आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या 17 जुलै 2006 च्या पत्रान्वये संबंधित नगरपालिका / नगर पंचायत / महानगर पालिका यांना इमारत भाडे अनुदान शासनाच्या पूर्व मान्यतेने किंवा शासनाकडून प्रशासकीय आदेश मिळाल्यानंतर देय केले जाते. त्यामुळे 2004 पासून या शाळांना इमारत भाडे अनुदान देण्याबाबत अधिक सुस्पष्टता आणली जाईल अशी माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी विचारला होता.
