नवी दिल्ली, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढयात महत्वाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे अभिवादन करण्यात आले.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीर कुमार बिस्वास यांनी शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे,सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात शहीदांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात शहीद भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आज अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
