ठाणे, दि. २६ : ठाणे येथील विद्यादान सहाय्यक मंडळ (व्ही.एस.एम) ह्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक सदस्य, व्यावसायिक आणि अभ्यासकांसाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय सामाजिक कार्यसिध्दांत ते प्रभावी सराव या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार २७ मार्च सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही परिषद ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. यामध्ये साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी होणार आहे. परिषदेचे उदघाटन आणि बीज भाषण महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण व न्याय आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (आयएसए) करणार आहेत. ह्या परिषदेत प्रख्यात पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ.निलेश हेडा, ‘निर्माण’चे अमृत बंग सामाजिक विषयावर मुक्त संवाद साधणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, परंतु https://forms.gle/eWmFb3MSahJk4VAv9 दिलेल्या लिंक वर पूर्व नोंदणी मात्र अनिवार्य आहे.
