राजे संस्कार प्रतिष्ठानचा 12 महिने 12 किल्ले मोहिमेला प्रारंभ
ठाणे, दि. २७ मार्च : रखरखत ऊन, आगी मोहोळ अर्थात माध्यमाशांची भीती. गेल्याच आठवड्यात मधमाशांनी शिवप्रेमीवर हल्ला केला होता. हे सर्व झुगारून आज हिरकनिने पाच महिन्याच्या बाळालाच घेऊन शिवनेरी सर केला.
‘राजे संस्कार प्रतिष्ठान’ ठाणे या संस्थेचे अध्यक्ष प्रा. संभाजी शेळके यांनी अवघा महाराष्ट्र 12 महिने 12 किल्ले सर करण्याची मोहीम आयोजित केली आहे. या प्रमाणे महाराजांच्या जन्मभूमीपासून आज प्रारंभ केला. या मोहिमेत तब्बल 21 जण सहभागी झाले होते. उत्साह शिगेला पोचलेल्या या मोहिमेत उत्स्फुर्त प्रतिसादाने कविता पवार या मातेने उडी घेतली. आपल्या बाळावर जन्मताच शिवसंस्कार व्हावेत यासाठी हिरकणी बनली. पण ही हिरकणी चक्क आपल्या पाच महिन्याच्या बाळाला (गौरांश) घेऊनच रखराखत्या उन्हात शिवनेरी सर केला. यामूळे सर्वत्र या महिलेचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, प्रा. संभाजी शेळके यांनी आवाहन केले आहे कि हा प्रारंभ आहे , दर महिन्याच्या एका रविवारी आम्ही बारा महिने बारा किल्ले सर करण्याचा चंग बांधला आहे. मोहिमेत कुणाला सहभागी व्हायचे असल्यास थेट +91 93218 84566 या नंबरवर संपर्क साधावा. एक वर्षानंतर अर्थात मे 2023 मध्ये मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्याचा संस्थेचा मानस आहे.
