ठाणे, दि.20(जिमाका) :-विविध अभ्यासक्रमांसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वेळेवर जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी विद्यार्थ्यांनी https://etribalvalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जात पडताळणी प्रस्ताव अर्ज ऑनलाईन सादरकरावे, असेआवाहनकोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सह आयुक्त तथा उपाध्यक्ष दिनकर पावरा यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इ. जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घ्यावयाचाआहे,अशाविद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्रजोडणे अत्यावश्यक आहे. त्यानुसारसन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकिय शिक्षण, अभियांत्रिकी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादीसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणी प्रस्ताव https://etribalvalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करूनप्रस्तावाची प्रत समिती कार्यालयात जमा करावी. जेणेकरून विहित मुदतीत पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल. तसेचविद्यार्थ्यांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यामुळे जात वैधता प्रमाणपत्रा अभावी होणाऱ्या विलंबास जात प्रमाणपत्र पडताळणीसमिती कार्यालय जबाबदारी राहणार नाही, असेही श्री. पावरा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत काही अडचणी असल्यास दूरध्वनीक्रमांक 022-25302930 वर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पावरा यांनी केले आहे.
