ठाणे दि. २० : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी निवड झालेल्या बालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २९ एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढदेण्यात आली आहे. बालकांच्या पालकांनी विहित वेळेत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनीले आहे.
प्रवेश प्रक्रियेतील निवड झालेल्या बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलॉटमेंट लेटरची (allotment letter) ची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका, महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करायची आहेत.
यंदाच्या वर्षी जिल्हातील १०४२९ बालकांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत ४४२९ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तरी उर्वरित बालकांच्या पालकांनी शासनाने दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
