ठाणे, दि. 28 : 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या माहिती पत्रकांचे ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणानंतर जाहीर सामुहिक वाचन करण्यात यावे, असे निर्देश बार्टीचे महासंचालकधम्मज्योती गजभिये यांनी दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणेमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील जनसामान्यांकरीता विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आय.बी.पी.एस., एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. या स्पर्धापरिक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनासह मोफत प्रशिक्षण व कौशल्य 3767 युवा गटांची निर्मिती असून संपूर्ण महाराष्ट्रात 345 समतादूत व जिल्हास्तरीय प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेत. या समतादूतांमार्फत खेडोपाडी पथनाटय व प्रबोधन कार्यक्रमामार्फत योजनांची प्रचार व प्रसिद्धी होत असते..
बार्टीच्या या विविध योजनांची माहिती ग्रामस्तरापर्यंत व्हावी यासाठी महाराष्ट्र दिनी समतादुतांमार्फत ग्रामपंचायतीमध्ये माहिती पत्रकाचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे.
