ठाणे, दि. 28 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन रविवार दि. 1 मे 2022 रोजी साकेत मैदानावरील पोलिस क्रीडा संकुलात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. सकाळी 8.00 वाजता नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
