

ठाणे, दि. 30 ः प्रोजेक्ट सुविद्य या संकल्पनेतून श्री बल्लाळ विनायक माध्यमिक प्रशाला पाली व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय पाली सुधागड, रायगड या प्रशालेचे व महाविद्यालयाचे सुधागड रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन टाटा कॅपिटलचे पदाधिकारी अश्विन सर. तसेच सुधागड रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, वसंत लहाने, सुधागड तालुका समन्वयक तथा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष निंबाळकर सर, पत्रकार दत्तात्रेय दळवी, सिद्धेश्वरचे सरपंच नरेश यादव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला पाच्छापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक माळी, ग. बा.वडेर हायस्कूलचे साह्य. शिक्षक. जगताप व आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ गेली 40 वर्षे सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या विकासासाठी, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक योजनांमध्ये कार्यरत आहे. को.ए.सो.डॉ.प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी येथे टाटा कॅपिटल आणि सुधागड रहिवाशी संघ ठाणे यांच्या संयुक्त विद्यामाने बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन समारंभ विद्यालयाचे चेअरमन अॅड. प्रविणभाई कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सदर शौचालय उदघाटन टाटा कॅपिटलचे पदाधिकारी अश्विन नायडू व नेहा भक्तीयाने तसेच सुधागड तालुका रहिवाशी संघ ,ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे उपाध्यक्ष वसंत लहाने, समन्वयक निंबाळकर, सदस्य तथा पत्रकार दत्तात्रेय दळवी आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमाला मा.श्री .फापाळे सर(माणगांव हायस्कूल), सूर्यवंशी सर(जांभुळपाडा हायस्कूल), हेमाडे सर( पेडली हायस्कूल) आदि मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना विजय शिरसाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व सेवक वृंद यांच्या सहकार्याने अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडला.
सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल यांनी विद्यार्थ्यांना मुलभूत प्रश्नाची सोडवणूक केल्याने सुधागडातील विद्यालयांच्या वतीने खुप खुप आभार व्यक्त करण्यात आले.
