नवी मुंबई, दि.06 : कोकण विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या कामकाजातील भ्रष्टाचाराबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक दि.9 जून 2022 रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्स) विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई या ठिकाणी घेण्यात येईल.
ज्या नागरिकांना कोंकण विभागातील शासनाच्या विविध कार्यालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणा-या भ्रष्टाचारा बाबतच्या तक्रारी द्यावयाच्या असतील, त्यांनी अशा तक्रारी लेखी स्वरुपात आवश्यक त्या पुराव्यासह प्रथमत: आपल्या जिल्हास्तरावरील भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे सदर तक्रारी सादर कराव्यात. जिल्हास्तरावरील भ्रष्टाचार निर्मुलन समितीने दिलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास, तदनंतरच या समिती समोर दि. 9 जून 2022 रोजी बैठकीच्या वेळेपूर्वी उपरोक्त पत्त्यावर (दोन प्रतीत) समक्ष तक्रारी द्याव्यात. सदर तक्रार अर्जांच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून सविस्तर चौकशी करण्यात येईल व अहवाल प्राप्त होताच सदरची प्रकरणे लगतच्या विभागीय भ्रष्टाचार निमुर्लन समितीच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात येतील. असे कोकण विभागीय उपायुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव, श्री.मकरंद देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
