मुंबई, दि. ८ जूम : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा आहे. याशिवाय यंदा निकालात मुलींनी बाजी मारली. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.24 टक्के आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण – 97.22 टक्के
पुणे – 93.61
टक्के कोल्हापूर – 95.07
टक्के अमरावती – 96.34
टक्के नागपूर – 96.52 टक्के
लातूर – 95. 25 टक्के
मुंबई – 90.91 टक्के
नाशिक – 95.03 टक्के
औरंगाबाद – 94.97 टक्के
निकालात मुलींची बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 95.35 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 93.29 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
