ठाणे, दि. ७ जून : ६ जून म्हणजे छत्रपती शिवरायांचा, म्हणजेच आपल्या दैवताचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा दिवस. अनेक मावळे, शिवप्रेमी विविध शिवप्रेमी संस्था रायगडावर जाऊन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असतात. खरच अभिमानास्पद गोष्ट. अशीच एक ठाण्यातील प्राध्यापक संभाजी शेळके यांनी स्थापन केलेली राजे संस्कार प्रतिष्ठान एक छोटीशी संस्था. ही छत्रपतींच्या विचारांवर कार्य करणारी संस्था. महाराष्ट्रातील वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेऊन यावर्षी शिवराज्यभिषेक दिन एका बालकाश्रमात जाऊन साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार टिटवाळा येथील बाल भवन या आश्रमात जाऊन तेथील बालकांना सॅनिटायझर, हँडवॉश, कपडे, खाऊ, इत्यादींचे वाटप करून मोठ्या आनंदात साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळा हा दिवस. या उपक्रमात प्रफुल्ल गावडे, आशिष गडेकर ,संगीता माळी, गुरुराज व जान्हवी यांनी सहभाग घेतला.
