ठाणे, दि. 07 :- महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ठाणे जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार, जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येऊन प्राप्त अर्जाचा आढावा घेण्यात येतो. मात्र, गेल्या दोन वर्षात कोवीड परिस्थितीमुळे महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येत नव्हते. मात्र, या महिन्यापासून जिल्हा व तालुका आणि विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती श्री. गायकवाड यांनी दिली आहे.
