ठाणे, दि. 24 :- ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यकक्षेतील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ठाणे यांनी दि. ३० जून २०२२ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत खालील कृत्यांना मनाई आदेश लागू केले आहेत.
या कालावधीतशस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदूका, सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांत प्रचार करणे. व्यक्तिचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे, तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किवा लोकांत प्रचार करणे. पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास केली आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
