
ठाणे, दि.12 (प्रतिनिधी) भाग्यश्री रासने : ठाणे शहर जिल्ह्यात शिवसेना पक्ष रुजवणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा जीवनपट ज्या सुंदर चित्रपटातून मांडण्यात आला त्या चित्रपटाच्या शिर पेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ‘या चित्रपटाला देशात तसेच परदेशात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपट समीक्षकांनीही या सिनेमाचे तोंड भरून कौतुक केले. या सेनेमाचा पुरस्काराने गौरव होऊ लागला असून “दादासाहेब फाळके एक्सलन्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेता मंगेश देसाई यांचा साहिल मोशन पिक्चर्स आणि झी स्टुडिओजने ‘धर्मवीर’या चित्रपटाची निर्मिती केली ,प्रवीण तरड़े यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, क्षितिज दाते, श्रुती मराठे, अभिजीत खांडकेकर, देवेंद्र गायकवाड़, रमेश परदेशी, गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे तसेच अनेक उत्कृष्ट कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
धर्मवीर या सिनेमातील प्रसाद ओक यांना २०२२ या वर्षीचा “दादा कोंडके स्मृति गौरव” सन्मान देण्यात आला.यावेळी प्रसाद ओक यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे,निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास मंडळ, सौ. माणिक ताई व पद्माकर मोरे, संतोष परब त्याचबरोबर खासदार श्री.श्रीकांत शिंदे व माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मन:पूर्वक आभार मानले.
“लोकनेत्याच्या भूमिकेसाठी लोकशाहीराच्या नावाने सन्मानित व्हावे. यासारखे भाग्य नाही. श्री नटराजा शतशः प्रणाम. मला मिळालेला सन्मान मी माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो.” अशा शब्दात मनोगत व्यक्त केले.
