मुंबई, दि. 29 जुलै (पुनीत खांडेकर) : ब्रिगेड मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.सागर राजे भोसले व ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष मा.प्रतिक दादा सकपाळ व दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष मा.सदाशिव कोळी साहेब सोबत उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष मयूर पाटेकर हे ट्रॉमबे कोळीवाडा येथे जाऊन भेट दिली. त्याठिकाणी जाऊन समुद्री तटावर चाललेल्या बेकायदेशीर गोष्टींची नोंद घेत, योग्य ती मदत करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आपल्यासोबत सदैव असे प्रतिपादन मा.सागर राजे भोसले यांनी गावाकऱ्याना विश्वासपूर्व दिले. समुद्रामध्ये चालू असलेल्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलू व योग्य तो मार्ग काढू असे ते बोलत होते.
अधिकारी जर ऐकत नसतील तर जनआंदोलन उभे राहील असा इशारा त्यांनी दिला.

