मुंबई, दि. 1 आॕगस्ट, पुनीत खांडेकर (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव नाकारून राज्यपाल यांच्या शिफारशी नुसार विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याचे विद्यापिठाच्या व्यवस्थापन मंडळाने निर्णय घेतला आहे. या निर्णायास विरोध दर्शवित आहे.मुंबईतील पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधी मंडळाने आज दि १ आॕगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांची भेट घेतली व आंतरराष्ट्रीय वसतीगृहास राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली.
या शिष्टमंडळात SFI-AISF-सत्यशोधक विद्यार्थी संघटना-छात्रभारती-राष्ट्वादी विद्यार्थी संघटना-रिपब्लिकन सेना या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
शाहू महाराजांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य दैदिप्यमान आहे असे संघटनेचे मत आहे.महाराजांनी १८९६ साली वसतीगृहाची सुरूवात केली ,तेवढ्यावरच न थांबता त्यांनी अक्षरशः शेकडो शाळा आणि वसतीगृहांची स्थापना केली.२४ नोव्हेंबर १९११ साली त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा आदेश काढला.मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सुरूवात केली.
या सर्व शिक्षणाबरोबर महाराजांनी प्रौढ शिक्षण देखील सुरू केले.त्यांनी आपल्या संस्थानात शिक्षणा साठी हरतर्हेचे प्रयत्न केले.संस्थानातील दीन-दलित-सर्वसामान्य-गोरगरीब-बहुजन-अल्पजन या सगळ्यांना महाराजांनी त्यांच्या कुवतीनुसार,क्षमतेनुसार मिळेल तेथे संधी निर्माण करून महात्मा फुले व तत्कालीन समाज सुधारकांचा वारसा पुढे नेण्याचे बहुमुल्य कार्य केले.
असे असताना, शिक्षण क्षेत्रातील कार्याचा जरासाही संबंध नसणाऱ्या व स्वातंत्र्य आंदोलनात ब्रिटिशांकडे माफीनामा देऊन बाहेर पडणारे वि.दा.सावरकर यांचे नाव विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला देणे उचित ठरणारे नाही,असे संघटना मानते.
मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचेच नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी SFI व समविचारी संघटना करीत आहेत
कुलगुरूंना निवेदन दिल्यानंतर १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ मुंबई विद्यापीठात केंटिन परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर सभा व क्रांतिकारी गीते सादर केली.
या प्रसंगी मुंबई विद्यापीठास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी SFI च्या वतीने प्रविण मांजलकर यांनी केली,या मागणीस उपस्थितांनी पाठींबा व्यक्त केला.
