दि.३ ऑगस्ट २०२२, पुनित खांडेकर (प्रतिनिधी) : समाज कार्याचा अन् समाज उद्धाराची घोडदौड चालू असतानाच निसर्ग चक्री वादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील मौजे मढाली खुर्द येथील रायगड जिल्हा परिषद शाळा वांदोली या इमारतीच्या दुरूस्तीच्या कामाचे उद्घाटन रायगड जिल्हा पालक मंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

रोहा तालुक्यातील मढाली खुर्द येथील रायगड जिल्हा परिषद शाळा वांदोली या इमारतीचे निसर्ग चक्रीवादळात अतोनात नुकसान झाले होते.सदर इमारतीच्या दुरूस्ती साठी पालक मंत्री अदिती ताई तटकरे यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून पालक मंत्री अदिती ताई तटकरे यांच्याच हस्ते सदर कामाचे उदघाटन करण्यात आले. या इमारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध होणार असून येणारी पिढी देशाचे उज्वल भविष्य ठरवेल असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी रा.कॉं.पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. मधुकर पाटील, श्री. विजय मोरे, श्री. अनंत देशमुख, युवक तालुकाध्यक्ष श्री. जयवंत मुंढे, श्री. प्रसाद देशमुख, सरपंच श्री. हेमंत कडव, श्री. नंदकुमार मरवडे, श्री. महेश तुपकर, ग्रा.पं. सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, महिला मंडळ, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

