रोहा, दि.३० ऑगस्ट २०२२, पुनित खांडेकर(प्रतिनिधी) : रायगड जिल्हा मधील रोहा तालुक्यातील वरसे येथे आमदार अदिती तटकरे यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा अध्यक्ष मा. श्री.मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष मा. श्री. विनोद पाशीलकर, मा.श्री.अनिल भगत, मा.श्री.अनंतराव देशमुख, सरपंच मा.श्री.नरेश पाटील, उपसरपंच मा.सौ.मृणाली शिवलकर, मा.श्री.रामा म्हात्रे, मा.श्री. अमित मोहिते, मा.श्री. महेंद्र गुजर, मा.श्री. मयूर दिवेकर तसेच सर्व जेष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ ग्रामपंचायत सदस्य, सदस्या पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवाशांच्या सोयीसाठी एक नाविण्यपूर्ण अत्याधुनिक अश्या या बस स्थानकामध्ये wifi ची सुविधा उपलब्ध केली असून बसस्थानकाच्या भिंतींवर बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, स्वच्छता, तसेच शासकीय योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे सेल्फि पॉइंट उभारून गावाच्या सौदर्यात भर टाकली आहे. विकासात्मक दृष्टी ठेवून स्मार्ट व सुसज्ज असे हे बसस्थानक प्रवास करणाऱ्या अपंग, विद्यार्थी,महिला,जेष्ठ नागरिक अश्या प्रवाशांसाठी नक्की सोईस्कर ठरेल. तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकासकामे लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य देऊन यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे असे मत आमदार अदिती तटकरे यांनी व्यक्ती केले.

