मुंबई, दि. 3 ऑगस्ट. पुनित खांडेकर(प्रतिनिधी) : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा यांच्या वतीने १५ ऑगस्ट २०२२ च्या अमृतमहोत्सवी काव्यवाचन व वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.समाजात वैचारिक क्रांती घडावी, लोकसाहित्य तयार व्हावे या उद्देशाने कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मार्फत १५ ऑगस्ट २०२२ च्या अमृतमहोत्सवी काव्यवाचन व वकृत्व स्पर्धा सकाळी ११ वाजता कुणबी द्याती गृह (वाघे हॉल) परेल येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा ५ ते १८ आणि १८ ते पुढे अशा दोन वयोगटात होणार असून स्पर्धेचे विषय हे सामाजिक आहेत.
सहभागी होण्यासाठी युवाच्या https://forms.gle/VPfKkEMw5ZxaSnjs8 ह्या संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे, त्याच प्रमाणे वेळेचे आणि नियमांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्याचा कुणबी युवा कार्यकर्त्यांचा मानस आहे. सदर स्पर्धेला प्रशत्ती पत्र आणि रोख रक्कमेच्या स्वरूपात पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे.
.
