दि:- ३ ऑगस्ट, पुनित खांडेकर(प्रतिनिधी) : ओबीसी जनमोर्चाच्या वतीने ठाणे शहरातील सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांची सभा श्री. दशरतदादा पाटील (उपाध्यक्ष- ओबीसी जनमोर्चा) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. बाठिया आयोगाचा अहवाल आणि ओबीसी आरक्षण या विषयासाठी डॉ. प्रा.सई ठाकूर (टी.आय.एस.एस) यांची प्रमुख वक्त्या म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
दि.२९/७/२०२२ रोजी प्रभाग निहाय सोडत निघाली असून ओबीसी करिता मागील आरक्षण संख्या ३५ इतकी होती ती आता १५ जाहीर झालेली असून ओबीसी संख्या १०.४ दर्शवण्यात आलेली आहे.महाराष्ट्र राज्याने जयंतकुमार बाठीया आयोग नेमलेला असून तो सर्वोच्य न्यायालयाला सादर केला, परंतु त्या आयोगाने दिलेली आकडेवारी सदोष व अशास्त्रीय आहे असे मत डॉ.ठाकूर यांनी व्यक्त केले असून, जात निहाय जनगणना अत्यावश्यक का आहे त्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले.या सोबतच ओबीसी संदर्भातील आयोगांची थोडक्यात माहिती दिली.
सदर सभेला माजी महापौर मनोहर साळवी यांच्या सह नगरसेवक उमेश पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले, ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किणे, भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी, माजी विरोधी पक्षनेत्या नगरसेविका प्रमिला केणी, माजी नगरसेविका अपर्णा साळवी, माजी नगरसेवक मिलिंद साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी, माजी नगरसेवक हिरा पाटील व इतर मान्यवर माजी नगरसेवक आणि नगरसेविका देखील उपस्थित होत्या
कार्यक्रमाचा समारोप करते वेळी दशरथदादा पाटील यांनी ओबीसी १०.४ संख्या ही चुकीची आहे असे मत दर्शवले. त्याच प्रमाणे लोकसभे मध्ये योग्य मांडणी होत असेल,ओबीसी संदर्भात आवाज उचलला जात असेल तर सर्वोच्य न्यायालय योग्य पुरव्या नुसार योग्य तो न्याय समाजला देऊ शकेल. ओबीसी आरक्षण संघर्षात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन फक्त ओबीसी समाजाचा विचार करून लढ्यात सामील व्हायला हवे. आगामी काळात वेळ आलीच तर ओबीसी समाज हा रस्त्यावरची लढाई लढेल असे देखील त्यांनी प्रतिपादन केले.
