ठाणे दि. 3 आगस्ट : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित (महाप्रित)च्या वतीने महादिवा या कार्यक्रमाअंतर्गत सुधारित निर्धुर चुलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी दि. 15 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
महाप्रितच्या वतीने राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील रहिवाशांकरीता पर्यावरणीय अनुकूल सुधारीत निर्धुर चुल मोफत वाटपासाठी निकष योग्य रहिवाश्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी लाभार्थी अनुसुचित जातीचा असावा, दारिद्ररेषेखालील असावा, त्यांच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन नसावे, अशा अटी आहेत. सर्व जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी दि.15 ऑगस्टपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांशी अथवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.
यासंबंधीची अधिक माहिती https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या ठाणे जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.
