मुंबई दि. 05 ऑगस्ट : मुंबई बोरिवली येथे राहणारे आणि कांदिवली येथे महिंद्रा टॅक्टर कंपनीत काम करणारे अनुराग पवार यांना ‘बांगिया कला केंद्र कलकत्ता’ यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार प्राप्त झाला. बांगिया कला केंद्र कलकत्ता यांनी ऑनलाईन आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन भरविले होते. या प्रदर्शनात अनुराग पवार यांच्या छायाचित्रांची निवड झाली.

या निवडीमुळे कामगार क्षेत्रात आनंदाचा वर्षाव होत आहे. कलकत्ता येथे “बांगिया कला केंद्र” ही संस्था आहे. या संस्थेच्या वतीने जून 2022 मध्ये ऑनलाईन छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांत 120 पेक्षा जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. या ऑनलाईन छायाचित्र स्पर्धेत अनुराग पवार यांनी विविध विषयावर पाच छायाचित्र पाठवली होती. त्यातील तीन छायाचित्रांची निवड करण्यात आली. अनुराग पवार यांना ‘प्रतिष्ठा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Excellent