ठाणे दि.8 : ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या जी. डी. सी. अँड.ए.व. सी. एच. एम. परीक्षा 2020 चा निकाल यापूर्वीच प्रसिद्ध झाला असून परिक्षार्थींनी संबंधित केंद्राच्या जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या कार्यालयातून एका महिन्यात गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतः येऊन घेऊन जावे, असे आवाहन जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्डाचे सचिव तथा उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण) महेंद्र मगर यांनी केले आहे.

या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके व प्रमाणपत्रे संबंधित केंद्राच्या जिल्हा उपनिबंधकांकडे देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील महत्वाचे दुवेमधील जी.डी.सी. ॲण्ड ए. मंडळ या ठिकाणी उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.
