????????????????????????????????????
ठाणे, दि.11 : नागरिकांना सकस, सुरक्षित व स्वच्छ अन्न पदार्थ मिळावे, यासाठी केंद्र शासनाने अन्न सुरक्षा मानके कायदा लागू केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 12 ऑगस्टपर्यंत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या वतीने अन्न व्यावसायिकांसाठी स्वच्छता मानांकन योजना सुरू केली आहे. या योजनेत खाद्यसेवा पुरविणाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.
खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पुरविणाऱ्या आस्थापनांसाठी स्वच्छता रेटिंग सुरू करण्यात आले आहे. यामध्ये खाद्य व्यवसायांची स्वच्छता, सुरक्षा विषयक प्रमाणे सुधारणे, फूड आउटलेटसंबंधीची माहिती घेणे व त्याची निवड करण्यास परवानगी देणे आदी निकष ठेवण्यात आले आहेत. स्वच्छता मानांकनासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफेटेरिया, ढाबे, मिठाईची दुकाने, बेकरी आणि मांस रिटेल स्टोअर्स इत्यादी खाद्य सेवा आस्थापनांनी अर्ज करावे, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.
