ठाणे, दि. 12 – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका, उत्सव ठाणे यांच्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून ऐतिहासिक टाऊन हॉल येथे ठाण्याच्या संस्कृती, इतिहासाची माहिती सांगणारे ठाणे टॉक्स हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. 13 व 14 ऑगस्ट 2022 रोजी दिवसभर मान्यवर या व्याखानमालेत सहभागी होणार आहेत.
उत्सव 75 अंतर्गत ही व्याख्यानमाला होणार असून या कार्यक्रमाअंतर्गत विविध व्याख्याते ठाण्याची संस्कृती ठाण्याचा इतिहास उलगडून दाखविणार आहेत. आपल्या ठाण्याच्या प्रगती मध्ये कशाकशाचे योगदान आहे ते सांगणारा ही आगळीवेगळी व्याख्यानमाला आहे. ठाण्याची औद्योगिक गाथा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगती त्याचबरोबर समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना हात घालणारे असे काही आपल्यासमोर मांडायला येत आहेत. डॉक्टर महेश बेडेकर ,रवींद्र ओवळेकर,प्रज्ञा पंडित , सौ. संजीवनी ब्रह्मे, सौ. लता दाते, पराग मीन, मंजुषा मीन,संतोष कारखानीस, पुरुषोत्तम अगवण, सदाशिव टेटविलकर, सीमा रेडकर आदींसह इतरही मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहे.
नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
