ठाणे, दि. 12 : – ठाणे येथे बेशुध्द अवस्थेत अनोळखी इसम आढळल्याने त्यास औषधोपचारासाठी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात आणले असता दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाल्याची नोंद ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मयत अनोळखी इसमाचे वर्णन असे :- अंदाजे वय 60 वर्षे, रंग गोरा, डोळे काळे, उंची 5 फुट 4 इंच, अंगाने सडपातळ, नाक सरळ, डोक्याचे केस काळे, दाढीचे केस थोडे वाढलेले, अंगात गुलाबी रंगाचा फुलशर्ट, तांबड्या रंगाची फुल पॅन्ट आहे.
सदर मयत अनोळखी इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले आहे.
