ठाणे, दि.12 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत भाईंदर येथील शंकर नारायण कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षा बंधन कार्यक्रम साजरा केला.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या इनर व्हिल क्लबच्या विद्यार्थींनीनी नवघर पोलीस स्टेशनचे अधिकारी,कर्मचाऱ्याना तसेच भाईंदर व नवघर अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी, नवघर रिक्षा चालक-मालक युनियनचे सदस्य यांना राखी बांधली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थींनींनी पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली.
या कार्यक्रमास भाईंदर अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बोराडे, नवघर अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी श्री. गीते, नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई, पोलीस निरीक्षक सुशील कुमार शिंदे व इतर अधिकारी, इनर व्हिल क्लबचे प्रमुख प्रा. शशिकांत माघाडे, समन्वयक प्रा. डॉ. अनुपमा गावडे, प्रा. अजित जाधव, प्रा. रुचिता राणे, डॉ. शीतल खडक्कर व प्रा. मोहन मह्ल्हनोर तसेच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने वक्तृव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी ‘ युवक आणि राष्ट्र’ या विषयावर विचार व्यक्त केले. वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील 23 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी अंतिम फेरीत निवडण्यात आले. श्रुती शर्मा या विद्यार्थिनीने प्रथम, राखी विश्वकर्मा या विद्यार्थिनीने द्वितीय तर तिसरे पारितोषिक भक्ती मोरे या विद्यार्थिनीने पटकावले. मानसी बोहरा व मुस्कान विश्वकर्मा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. अमोल बावसकर व प्रा. डॉ. संदीप बुरकेन यांनी काम पाहिले.
महाविद्यालयातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमातंर्गत देशभक्तिपर गायन व नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांत भोईर, व्दितीय क्रमांक करीम शेख आणि तृतीय क्रमांक अंतिमा तिवारी तसेच गुलशन श्रॉफ, प्रणय मिश्रा, ममता यादव व वनिता सुतार या विध्यार्थ्याना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सागर तिवारी आणि समूहाने देशभक्तीपर कव्वाली मेरीजान जाये वतन के लिये सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर नृत्य स्पर्धेत राज मैती प्रथम क्रमांक, ओंकार काळे व धुमिल दार्जी यांना विभागुन द्वितीय क्रमांक ,मिसबाह मेमन या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.सचिकेत गुप्ता यांनी केले.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना, वसुंधरा नेचर क्लब राष्ट्रीय सेवा योजना यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता करून 75 रोपे लावली.
