ठाणे, दि.18 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील सर्व मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहाध्ये व आश्रमशाळांमध्ये दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. तसेच भारताचे संविधानाचे वाचन करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ व ‘स्वराज्य महोत्सव’ या कार्यक्रमाअंतर्गत दि. ११ ऑगस्ट २०२२ ते १4 ऑगस्ट २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या साहित्य अंमली पदार्थ सेवन विरोधी प्रतिज्ञा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रॅली इत्यादी स्पर्धामधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व मिठाई वाटण्यात आली.
सदर कार्यक्रमांमध्ये सहायक आयुक्त समाज कल्याण ठाणे या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, वसतिगृहातील गृहपाल, कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थीनी, आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थीनी सहभागी झाले होते, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, ठाणे यांनी कळविली आहे.
