ठाणे दि.18 : ठाणे महसूल उपविभागात झालेल्या 264 अकस्मात मृत्यू प्रकरणी ठाणे उपविभागीय कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणी कोणास तक्रार, हरकत असल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी अविनाश शिंदे यांनी केले आहे.
ठाणे महसूल उपविभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडून एप्रिल 2022 ते जून 2022 अखेर पर्यंत एकूण 264 अकस्मात मृत्यु नोंद प्रकरणे ठाणे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. या मयतांच्या मृत्यूचे कारण, समरी नोंद, पोलीस ठाण्यांचे नाव व इतर माहिती जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकरणांची चौकशी करण्यात येणार असून मयत व्यक्तिच्या मृत्यूबाबत कोणाची संशय, तक्रार, हरकत असल्यास याबाबतचे म्हणणे किंवा त्याबाबतचे पुरावे साक्ष देण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, 217, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्टनाका, ठाणे (पश्चिम) येथे संपर्क साधून आपले म्हणणे लेखी अथवा तोंडी सात दिवसाच्या आत मांडावे, असे आवाहन ठाणे विभाग उपविभागीय दंडाधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.
