ठाणे दि. 22 :- ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे “वाहन” या संगणक प्रणालीवर परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी सध्या सुरू असलेली MH-04–LF मालिका संपल्यानंतर MH-04–LG ही मालिका सुरु करण्यात येणार आहे. आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठीचे अर्ज दि. 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 ते 1.00 या वेळेत स्विकारून पसंतीचे व आकर्षक क्रमांक विहीत शुल्क आकारून आरक्षित करण्यात येतील, याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.विजय शेळके यांनी कळविले आहे.
