ठाणे, दि. 24 : – मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत कोकण विभागातील समुदाय आधारित संस्थांकडून मुल्य साखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी आदिंनी अर्ज करण्याचे आवाहन विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती https://www.smart-mh.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी, त्यामध्ये माहिती भरुन व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक, आत्मा यांच्या कार्यालयात दि. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत. या अगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुनःश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही. कोकण विभागात ठाणे जिल्ह्यासाठी ३ लक्षांक असून, पालघरसाठी ७, रायगडसाठी १०, रत्नागिरीसाठी ८ व सिंधुदुर्गासाठी १० लक्षांक देण्यात आला आहे.
परिपूर्ण अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
