
मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२२ पुनित खांडेकर(प्रतिनिधी): मुंबईत संभाजी ब्रिगेड ईशान्य मुंबई जिल्हा पदनियुक्ती व आढावा बैठक, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधीरराजे भोसले व मुंबई अध्यक्ष मा.सागरराजे भोसले, मुंबई संघटक मा.नितीन बारस्कर, व ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष मा.प्रतिक दादा सकपाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तसेच संभाजी ब्रिगेड ठाणे शहर कार्याध्यक्ष सुजय सावंत, ठाणे शहर संघटक सत्यवान काशीद, हे ही उपस्थित होते बैठकीत प्रमुख उपस्थित असणारे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. सुधीर राजे भोसले यांनी अनेक महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले संभाजी ब्रिगेड ची पुढील वाटचाल, नवी दिशा-नवा विचार, या विषयावर मार्गदर्शन केले व काही सामाजिक कार्यकर्ते यांना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटने मध्ये पदनियुक्त करून जबाबदारी देण्यात आली. नियुक्ती पदाधिकारी यांची नावे पुढील प्रमाणे…संतोष देठे (ईशान्य मुंबई जिल्हा सचिव) मनोहर धनावडे(माजी सैनिक), (ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष), सागर शिरोळकर (ईशान्य मुंबई जिल्हा संघटक), सलिम शेख (मुलुंड विधानसभा अध्यक्ष), किरण पवार (घाटकोपर पश्चिम विधानसभा अध्यक्ष), राजू शिंदे (मुलुंड विधानसभा सचिव) प्रकाश दुधवडे (मुलुंड विधानसभा संघटक), शरद सरनोपंत (कोषाध्यक्ष मुलुंड विधानसभा)
बैठकीच आयोजन जिल्हा अध्यक्ष, प्रतिक दादा सकपाळ, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल म्हादये, मुलुंड विधानसभा अध्यक्ष सलिम शेख, संतोष देठे, राजू शिंदे, संतोष त्रिभुवन, इक्बाल खान, व सर्व सहकाऱ्यांनी केले असून नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

