ठाणे, दि. 08 : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 03 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 01.00 वा. जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार आहे. नागरिकांनी तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेत पाठवावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना निर्बंधामुळे शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करून परिस्थितीनुरुप व शक्य असल्यास दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) अथवा प्रत्यक्ष उपस्थितीत लोकशाही दिन आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, येत्या दि. 03 ऑक्टोबर 2022 रोजी दु.01.00 वा. नियोजन भवनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीचे तक्रार अर्ज दि.16 सप्टेंबर 2022 पूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेमध्ये पाठवावेत.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी अर्जदाराने प्रथम तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे.तसेच त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी.संबधित तक्रारीच्या प्रती लोकशाही दिनी सादर करावयाच्या अर्जासोबत जोडाव्यात.एका तक्रारी अर्जात एकच तक्रार असावी.
लोकशाही दिनामध्ये अर्ज करताना तक्रारदार ऑनलाईन अथवा समक्ष लोकशाही दिनामध्ये सहभागी होणार आहे, याबाबत अर्जामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा. तसेच अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक अंर्तभूत करावा, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
