ठाणे, दि. 08 : केंद्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सन 2022 च्या विविध क्रीडा पुरस्कारासाठी 20 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी कळविले आहे.
केंद्रीय भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय तर्फे मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
पुरस्कारांच्या मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलव्दारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची /अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्रशासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर सादर करावेत. ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास क्रीडा मंत्रालयाच्या section.sp4-moyas@gov.in या ईमेलवर किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9 ते सांयकाळी 5.30 पर्यत संपर्क करावा.केंद्रशासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती व नियमावली व विहित अर्जाचा नमुना https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विहित कालवधी नंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती साळुंखे यांनी केले आहे.
