मुंबई, दि 13 सप्टेंबर : माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपली छोटी छोटी काम विसरत नाही.याचे एक उत्तम उदाहरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपण कित्येक वेळा पाहिले असेल. मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्यातला कार्यकर्ता, नेता हरवलेला नाही. आपल्या पाठिशी असणाऱ्यांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाणं असो, मदतीचा हात पुढे करणं असो, यात एकनाथ शिंदे कायमच आघाडीवर असतात.क्षणाचाही विचार न करता एका कार स्वारासाठी धाव घेतली.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विलेपार्ले येथे असतानाच एका तरुणाच्या कारने पेट घेतला, मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्याचवेळी मुख्यमंत्री आणि त्यांच्या वाहनांचा ताफा याच रस्त्यावरून जात होता.
औरंगाबादहून मुंबईला येतांना मुख्यमंत्री याच मार्गानं विमानतळाहून घराकडे निघाले होते. वाटेतच त्यांना तरुणाच्या कारने पेट घेतल्याची दृश्य दिसली. कशाचाही विचार न करता त्यांनी आपला प्रवास थांबवत तरुणाची विचारपूस केली.
“जीव वाचला हे खुप मोठं आहे. काळजी करु नकोस, आपण गाडी दुसरी घेऊ असं म्हणत त्यांनी तरुणाला धीर दिला. पेटत्या कारपाशी जाऊ नकोस” असं ते तिथून निघताना काळजीपोटी म्हणाले. शिवाय संबंधित विभागाला तरुणाची मदत करण्याचे आदेशही दिले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला धीर पाहून काही क्षणांसाठी नेमकं काय घडलं हेच त्या तरुणाला कळले नाही. देवदूत आला असे काहीसे त्याच्या चेहऱ्यावर दिसत असणार.
