नवी दिल्ली, 14 सप्टेंबर, चित्रलेखा रासने (प्रतिनिधी) : 5G नेटवर्कची सेवा लवकरच भारतात सुरु होणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच रिलायान्स जीओ ने दिवाळीत 5G नेटवर्कची सेवा भारतात रोलआउट करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता ‘एअरटेल’नेही मोठी घोषणा केली आहे.
एअरटेलने सांगितले की, एअरटेलही 5G नेटवर्कची सेवा लवकरच सुरु करणार आहे. ग्राहकांसाठी ही दिवाळीआधीच मोठी भेट असणार असल्याचे एअरटेल कंपनीच्या सीईओंनी सांगितलं. एअरटेल 5G नेटवर्कची सेवा कधी सुरु करणार? असे प्रश्न ग्राहकांच्या मनात होते. मात्र यावर आता एअरटेल कंपनीने स्पष्टीकरण देत ग्राहकांना दिलासा दिला.
3 उपलब्ध करणार असल्याचे एअरटेल कंपनीचे सीईओ म्हणाले. एअरटेलच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या सिम कार्डवर 5 जी नेटवर्क काम करणार आहे, हा एअरटेल यूजर्ससाठी सर्वात मोठा दिलासा आहे.
तर दिवाळी आधीच ग्राहकांना कंपनीने जबरदस्त भेट दिली असून एअरटेलच्या 5G सेवेचा वेग खूप वेगवान असेल. ते 4G पेक्षा 20 ते 30 पट वेगाने धावेल. देशातील बड्या टेलिकॉम कंपन्यांच्या यादीत भारती एअरटेलचेही नाव असल्याचे ते म्हणाले. 4G पेक्षा 20 ते 30 पट वेगाने धावेल. या स्पीडमध्ये तुम्ही तुमचे डिजिटल संबंधित काम त्वरीत पार पाडू शकाल आणि कोणतीही महत्त्वाची फाईल त्वरित डाउनलोड करू शकाल.
