रायगड, दि. 21 सप्टेंबर, पुनीत खांडेकर(प्रतिनिधी) : आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या कळसांबडे गावात शिवस्मारका साठी ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने आदिती ताई तटकरे यांनी आमदार निधीतून १० लाख रुपये उपलब्ध करून दिले. दि.18 सप्टेंबर 2022 रोजी पत्रकारांना त्यांनी अशी माहिती दिली. छत्रपती शिवरायांना स्मरून आपल्या राजकीय जीवनाची घोडदौड करतांना आपल्या वडिलांच्या म्हणजेच खा. सुनील तटकरे यांच्या समाज सेवेचा वारसा जपत असताना आम. आदिती तटकरे नेहमीच आपल्याला जनसमुदायात मिसळताना बघायला मिळतात. त्यांच्या कडे समाजातील कोणीही व्यक्ती गेले असता तो निराश होऊन परतल्याचे कधीच ऐकायला येत नाही अशी कुजबूज तळा तालुक्यात आणि कार्यकर्त्यात नेहमीच ऐकायला मिळते. आपल्या गावात शिवस्मारक व्हावे या सद्दइच्छेने कळसांबडे गावच्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आमदार असलेल्या आदिती तटकरे यांच्या कडे स्मारकासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली . आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या कळसांबडे गावात शिवस्मारका साठी आदिती ताई तटकरे यांनी आमदार निधीतून १० लाख रुपये उपलब्ध करून दिले. या निधीसाठी ऍड उत्तमजी जाधव, देवा रामाणे, किशोर शिंदे, प्रवीण अंबारले आणि कळसांबडे गावातील युवकांनी पुढाकार घेतला. लवकरच शिवस्मारक होईल अशी माहिती देवा रामाने यांनी दिली आहे. गावातील राष्ट्रीय जलजीवन योजने अंतर्गत मंजूर झालेल्या योजनांचे भूमिपूजन आणि राष्ट्रीय पेयजल योजना उदघाटन खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते झालं असून यावेळी तळा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी नाना भाऊड, मा पंचायत समिती सभापती अक्षरा कदम , ऍड उत्तमजी जाधव, उपनगराध्यक्ष रोडे ,चंद्रकांत राऊत तसेच राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होते. मात्र विशेष लक्ष खासदार चें वेधले ते अडनाळे येथील भूमिपूजन आणि उदघाटन एकाच वेळेला घेण्यात आलं .त्यावर सुनील तटकरे म्हणाले की, अडनाळे गावातील एकूण कामं ही राष्ट्रवादी च्या माध्यमातूनच झाली आहेत आणि पुढे ही होतील. या कार्यक्रमात विशेष योगदान हे देवा रामाणे तळा तालुका युवा कार्यकर्ते तसेच इतर सर्वच जेष्ठ राष्ट्रवादी च्या मंडळींनी दिल्याचे तटकरेंनी नमूद केले.
