मुंबई, दि. 23 सप्टेंबर(प्रतिनिधी) : राष्ट्रीय चित्रपट दिना निमित्त मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया ने प्रेक्षकांना खास भेट देण्याचा निर्णय घेतला 23 सप्टेंबर रोजी तुम्ही फक्त 75 रूपयां मध्ये देशभरातिल चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा आंनद घेऊ शकता . यापूर्वी असा दिवस साजरा केला जात नसल्याने या निर्णयाने खुप आनंदाचे वातावरण पसरले आहे.कोरोना महामारीने हरवलेला प्रेक्षक पुन्हा सिनेमा गृहाची वाट धरण्यासाठी उत्सुक होईल. त्यामुळे एम आय ए ने सुरु केलेल्या उपक्रमातून प्रेक्षक व सिने सृष्टी चा फायदा होईल.
कोरोना व कोरोना नंतर ओटिटि प्लेटफॉर्म मुळे थिएटर मधली गर्दी कमी झाली . 50 टक्के ऑक्यूपेंसी नियमाने चित्रपट गृहे उघडली, पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अशा ही परिस्थितितही 4 हजार चित्रपट गृहात 75 रूपयांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला.
मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री अंर्तगत येते त्याची स्थापना 2002 मधे झाली 4000 स्क्रीन असलेल्या या असोसिएशन शी सुमारे 500 मल्टीप्लेक्स संबंधित आहेत.
एमआय ए च्या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना सिनेमा पाहण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही . हा उपक्रम यशस्वी झाल्यास सिनेमागृहातून हरवलेला प्रेक्षक पुन्हा सिनेमागृहाकड़े वळेल. अशी आशा आहे.
