मुंबई, दि. 26 सप्टेंबर(प्रतिनिधी) : बाळासाहेब ठाकरेंचे सहाय्यक आणि सर्वात विश्वासू चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थापांनी शिंदे गटात प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले होते. गळती अद्याप सुरूच आहे. आता बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
चंपासिंग थापा यांच्या सोबतच बाळासाहेब ठाकरेंचे आणखी एक निकटवर्तीय मोरेश्वर राजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेवून पुढे जात आहात, म्हणून थापा माझ्यासोबत आलेत.
माहितीनुसार, चंपासिंग थापा 30 वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. सुरुवातीच्या काळात मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी छोटी-मोठी कामं केली.
भांडूपचे नगरसेवक के.टी.थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला. त्यानंतर पुढील काही काळातच थापा बाळासाहेबांचे लाडके झाले.
थापा बाळासाहेब ठाकरेंचं जेवण, औषधांच्या वेळा यासारख्या रोजच्या गोष्टींवर लक्ष ठेवत. मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर थापांनी बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली.
