मुंबई, दि. 1 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये आजपासून टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी तर ऑटोरिक्षेचे भाडे दोन रुपयांनी वाढणार आहे. मुंबई आणि मेट्रोपोलिटन क्षेत्रातील लोकांना आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करताना दीड किलोमीटर अंतरासाठी कमीत कमी 28 रुपये आणि ऑटोरिक्षेने प्रवास करताना कमीत कमी 23 रुपये द्यावे लागार आहेत.
ही भाडेवाढ आजपासून लागू होईल. दरम्यान ऑटो आणि टॅक्सीच्या भाडे वाढीच्या मागणीकडे गेल्या कीत्येक दिवसांपासून सरकार दुर्लक्ष करत होते.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) ने सांगितले की, पेट्रोल आणि सीएनजी संचालित टॅक्सीवर ही भाडेवाढ लागू होईल. त्याचबरोबर एक मार्च 2021 मध्ये सीएनजी गॅसची कींमत 49 रुपये प्रति किलोग्राम होती, आता 8011 रुपये प्रति किलोग्राम आहे. याशिवाय महागाई आणि राहणीमान खर्चासह इतर खर्चही वाढले आहेत.
निळ्या-सिल्व्हर ‘कूल’ कॅब टॅक्सीचे भाडे किमान अंतरासाठी 30 रुपयांवरून 40 रुपये प्रति किलोमीटर करण्यात आले असून त्यानंतर 26.71 रुपये प्रति किलोमीटर भरावे लागणार आहेत. एमएमआरटीएने नवीन दरानुसार भाडे मीटरचे समायोजन करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला आहे.
