मुंबई, दि.6 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : राज्यात काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालाय. पावसानं उघडीप दिलीय. परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झालंय. सध्या पावसानं उघडीप दिली असली तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळता अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
राज्यात सध्या पावसानं उघडीप दिलीय. परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागानं दिलीय. 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. अशातच आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवलाय.
आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलीय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट दिलाय. आता 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिलीय. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे.
जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिलीय. त्यामुळं सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी आहे.
