मुंबई, दि. 6 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधा अनुदान योजनेंतर्गत ६२५ कोटी रुपये आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १ हजार १९४ कोटी रुपये निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना ऑक्टोबर महिन्यात वितरीत करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिलीय.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार निराधारांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजारपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थींना रुपये १ हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असलेल्या व २१,०००/- रुपयां पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस दरमहा रु. १,०००/- अर्थसहाय्य देण्यात येते.
दरम्यान, सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ५९५ कोटी रुपये आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत १०५३ कोटी निधी खर्च झाला आहे.
