मुंबई, दि. 10 ऑक्टोबर (प्रतिनिधी) पुनीत खांडेकर : Walking Through Time या पुस्तकात छत्रपती संभाजी बद्दल बदनामीकारक लिखाण केल्या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सागरराजे भोसले, मुंबई संघटक नितीन बारस्कर, ईशान्य मुंबई जिल्हाअध्यक्ष प्रतिक सकपाळ, जिल्हा संघटक सागर सुरळकर, मुलुंड विधानसभा अध्यक्ष सलीम शेख, विधानसभा सचिव राजु शिंदे, आकाश चंदनशिवे, सविन गवई, जयेश सुरळकर, महेश पालव व अन्य पदाधिकारी यांनी पोद्दार शिक्षण संस्थेच्या ऑफिसवर धडक देऊन जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदीवला व जाब विचारण्यात आला. त्याच प्रमाणे पोलीस अधिकारी यांच्या समवेत पोद्दार शिक्षण संस्थेच्या कमिटी सोबत चर्चा करण्यात आली व कुठलाही पुरावा नसताना पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात येत आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सागरराजे भोसले यांनी केला. त्या नंतर पोद्दार संस्थेनी संभाजी ब्रिगेड च्या सर्व पदाधिकारी यांची माफी मागून आमची चूक झाली व सर्व शाळांमधून हे पुस्तक परत मागवून त्या मजकुरात सुधारणा करत पुस्तकाची १ प्रत संभाजी ब्रिगेडला पाठवण्यात येईल व परत अशी चूक होणार नाही असे म्हणून माफी मागत लेखी माफीनामा घेण्यात आला. त्या नंतर चर्चेच्या शेवटला पोद्दार शिक्षण संस्थेला सांगण्यात आलं की परत महापुरुषां बद्दल असा चुकीचा आणि अपमानास्पद मजकूर शालेय पुस्तकात छापला गेला तर संभाजी ब्रिगेड स्टाईल ने धडा शिकवला जाईल व आंदोलन छेडण्यात यईल असा इशारा देण्यात आला…
